सांगोला / प्रतिनिधी : सांगोला येथील श्री अंबिका देवी यात्रा प्रदर्शन समिती सांगोला यांच्यावतीने , श्री अंबिका देवी यात्रे निमीत्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात . मात्र अवघ्या आठ दिवसावर आलेली सांगोला ची यात्रा बाबत कोणतीही बैठक व चर्चा होताना दिसून येत नसल्याने | कोरोना मुळे यंदा यात्रा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
. याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये यात्रेची उत्सुकता कायम आहे १ ९ फेब्रुवारी रोजी स्थसप्तमी च्या पार्श्वभूमीवर यात्रेबाबतच्यानिर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे . श्री अंबिका देवीची यात्रा रथसप्तमी मुहूर्तनुसार बुधवार १० रोजी अमावस्या असल्याने अमावस्या च्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच गुरुवार पासून रीतीरिवाजा प्रमाणे सुरू होते . तर सलग नऊ दिवस चालणाऱ्या यात्रेचा दिनांक १ ९ फेब्रुवारी रोजी समारोप होतो . | परंतु यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट दिसून येत आहे . सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी | यात्रेचे हे ७४ वे वर्ष असून सलग ७३ वर्ष ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते . | स्थसप्तमीच्या पुर्वी नऊ दिवस वेगवेगळे| उपक्रम राबवून यात्रा कालावधीमध्ये पाळणे , खेळणी यासह शेतीमालाचे प्रदर्शन व विविध | स्पर्धाचे आयोजन करण्यात येते . श्री देवीची सवाद्य मिरवणूक काढली जाते . यात्रा काळामध्ये सुप्रसिद्ध असा शेळ्या , मेंढ्या व जनावरांचा सर्व प्रकारचा बाजार भरविला जातो.जंगी कुस्त्याचा कार्यक्रम घेत , शोभेचे |दारुकाम , मिनी मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करून सांगोला यात्रा पार पडते . मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर हा एकमेव उपाय असल्याने राज्यातीलच नव्हे तर सर्वच ठिकाणच्या यात्रा उत्सव रद्द करण्यात आले आहेत . या पार्श्वभूमीवर सांगोल्याची यात्रा चालू वर्षी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे . याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपलेली यात्रा कालावधी असून सुद्धा कोणताही गाजावाजा व बैठका झाले नसल्याने यात्रे संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे . अशीपरिस्थिती असली तरी यात्रेची उत्सुकता = नागरिकांमध्ये कायम आहे . याबाबत शहर - आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चाही । होताना दिसून येत आहे . : श्री अंबिका देवी यात्रा उत्साहात व । यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कोर्ट 1 रिसिव्हर्स व प्रदर्शन समिती सांगोला यांचा | पुढाकार असतो . सदर आयोजकांकडून - यात्रेपूर्वी पासूनच योग्य नियोजन केले जाते . । परंतु यंदा यात्रे संदर्भात हालचाली दिसून येत - नसल्याने नेमकी यात्रा भरणार की नाही - याबाबत तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता । लागून राहिली आहे
0 Comments