आता Google map म्हणणार उजवीकडे/डावीकडे वळा ; Google मॅप्सची सुविधा आता मराठीत
मुंबई : गुगल मॅप्स हे अॅप जगभरातील वाहनचालकांना रस्ता दाखवण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण Google मॅप्सची सुविधा आता 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्या 10 भाषांमध्ये मराठीचाही समावेश असणार आहे.
इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे युजर्सच्या गरजा पूर्ण केल्या जातात. रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करण्यासाठी, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स, एटीएम शोधण्यासाठी आपण गुगल मॅप्सचा वापर करतो.
गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू होत असल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सना एखादा पत्ता शोधणे सोपे होणार आहे. एका ब्लॉगपोस्टद्वारे गुगलने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की गुगल मॅप्सची सुविधा आता मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कन्नड, पंजाबी, उडिया, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध असूनही कोट्यवधी भारतीय युजर्स गुगल मॅप्सचा वापर करतात. दरम्यान आता 10 प्रादेशिक भाषांमध्ये गुगल मॅप्स सेवा देणार असल्याने गुगल मॅप्सच्या भारतीय वापरकर्त्यांची संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे आता रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करताना, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, मॉल्स बँका-एटीएम शोधण्यासाठी तुम्ही मराठी भाषेचा वापर करु शकता.
0 Comments