google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 व्यवसायात अपयश व सावकाराकडून वारंवारच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली पडून आत्महत्या !

Breaking News

व्यवसायात अपयश व सावकाराकडून वारंवारच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली पडून आत्महत्या !

 सुतारकाम फर्निचर व्यवसायात अपयश आल्याने कर्जबाजारी झालेल्या व कर्ज घेतलेल्या सावकाराकडून वारंवारच्या तगाद्याला कंटाळून रायबाग तालुक्यातील भिरडी येथील एकाच कुटुंबातील चौघांनी रायबाग रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे रुळावर बुधवारी रात्री हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे . 


या बाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , आत्महत्याग्रस्त कुटुंब रायबाग तालुक्यातील भिरडी येथील आहे . सत्यापा उर्फ कल्लाप्पा अण्णाप्पा सुतार ६० , महादेवी सत्यापा सुतार ५०, संतोष सत्यापा सुतार वय २६ , दत्तात्रय सत्याप्पा सुतार वय २८ असे आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत . बुधवारी रात्री ८ वाजता सदर सुतार कुटुंबीय शेजाऱ्यांना सांगून आपला एक मुलगा बेळगाव येथे राहायला असून तो आल्यानंतर त्यांना हा मोबाईल संच द्यावा आम्ही आपण परगावी जाऊन येतो असे सांगितले होते . 

आत्महत्त्येस जबाबदार कोण ? 

सुतार कुटुंबीयांच्या आत्महत्येमागील मुख्य कारण कर्ज प्रकरण असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे . सदर कुटुंबीयांनी कोणत्या बँकेतून कर्ज घेतले होते अथवा कोणत्या सावकाराकडून कर्ज घेतले होते याचा उलगडा पोलिसांनी करणे गरजेचे आहे . दरम्यान या कुटुंबाचे प्रमुख सत्याप्पा सुतार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे ? याचा उलगडा आता जरी झाला नसला तरी कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने या कुटुंबीयांनी आत्महत्या केली असावी , असा संशय व्यक्त होत आहे . त्यामुळे याप्रकरणी संबधित सावकार अथवा बँके विरुद्ध कारवाई व्हावी , अशी मागणी भिरडी ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे .

त्यानंतर रात्री सर्वजण रायबाग रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या रेल्वे रुळावर येऊन बुधवारी मध्यरात्री हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वे खाली आत्महत्या केली . रेल्वे चालकाने वारंवार फॉर्म करून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले . मात्र त्यानी चालकाला कोणताही प्रतिसाद न दिल्याने रेल्वे चालकाला अनिवार्यपणे रेल्वे पुढे घेण्यास भाग पडले , असे पोलिसांकडून सांगण्यात आले . सदर आत्महत्या केलेल्या सत्यापा सुतार याच्या खिशामध्ये डेट नोट सापडली आहे . 

रेल्वे पोलिसांनी ती जप्त करून पुढील तपास सुरू ठेवला आहे . हजरत निजामुद्दीन रेल्वे चौघांच्याही शरीरावरुन गेल्याने त्यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता . आत्महत्या केलेल्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती . सदर घटनेचे दृश्य थरकाप उडवणारे होते . 

आत्महत्या केलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर ते स्थानिक नागरिक व त्यांच्या नातेवाईकांकडून भिरडी तालुका रायबाग येथे आणून सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती . याबाबत बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे . रेल्वे पोलीस पुढील तपास करत असून तपासणी झाल्यानंतरच घटनेमागील सत्य उघडकीस येणार आहे .

Post a Comment

0 Comments