सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) दिव्यांग , निराधार , वयोवृद्ध नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत आधार दिला जात आहे
. मार्च ते ऑक्टोबर २०२० अखेर सांगोला तालुक्यातील १६ हजार ० ९ ० लाभार्थ्यांना १० कोटी १० लाख ३ ९ हजार रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे . संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी हयातीसाठी आवश्यक कागदपत्रे ३१ मार्च पर्यंत तहसील कार्यालयात सादर करावीत . अन्यथा १ एप्रिल पासून अनुदान बंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले . राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध आठ योजनेच्या माध्यमातून दिव्यांग , निराधार , वयोवृद्ध नागरिकांना दर महिना अनुदान वितरित केले जाते . मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत सांगोला तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनानिहाय पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे . संजय गांधी निराधार योजनेसाठी ( सर्वसाधारण ) २ कोटी ९ ० लाख ८३ हजार ०२४ रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी ३५ ९ ६ लाभार्थ्यांना २ कोटी ९ ० लाख ८ हजार २०० रुपयांचे वाटप , संजय गांधी निराधार योजनेसाठी ( अनुसूचित जाती ) ३८ लाख २ ९ हजार ७६७ रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी ४८५ लाभार्थ्यांना ३८ लाख २ ९ हजार ६०० रुपयांचे वाटप , श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेसाठी ( सर्वसाधारण ) ४ कोटी २७ लाख ७ ९ हजार ९ ७४ रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी ५५२५ लाभार्थ्यांना ४ कोटी २० लाख ८० हजार १००रुपयांचे वाटप , श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेसाठी ( अनुसूचित जाती ) ९ ४ लाख ०७ हजार ६०० रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी १५०० लाभार्थ्यांना ९ ० लाख १ ९ हजार ५०० रुपयांचे वाटप , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी १ कोटी ६० लाख ७२ हजार ६०० रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी ४७२७ लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ७० हजार ८०० रुपयांचे वाटप , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेसाठी ८ लाख ०२ हजार ९ ४६ रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी २१७ लाभार्थ्यांना ८ लाख ०२ हजार ४०० रुपयांचे वाटप , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेसाठी ८६ हजार ६४ ९ रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी २६ लाभार्थ्यांना ८८ हजार ४०० रुपयांचे वाटप , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी २ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त , त्यापैकी १४ लाभार्थ्यांना १ लाख ४० हजार रुपयांचे वाटप , असे एकूण १६ हजार ० ९ ० लाभार्थ्यांना १० कोटी १० लाख ३ ९ हजार रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे . उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून संजय गांधी योजनेसाठी १७२ प्रकरणे आली . त्यात १५७ प्रकरणे मंजूर तर १५ प्रकरणे नामंजूर झाली . श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी २ ९ ० प्रकरणे आली होती . त्यात २६२ प्रकरणे मंजूर तर २८ प्रकरणे नामंजूर झाली . या समितीचे सचिव म्हणून तहसीलदार तर सदस्य म्हणून मुख्याधिकारी काम पाहत आहेत . दिव्यांग , निराधार असलेल्या गरजूंनी या योजनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन तहसिलदार अभिजित पाटील यांनी केले आहे .
0 Comments