पत्नीने दोन मुलांच्या मदतीने केला व्यसनी पतीचा खुन ; सांगोला तालुक्यातील नाझरा गावातील घटना !दारू पिऊन पत्नी व मुलांना वारंवार मारहाण करून त्रास देत असलेल्या पतीला मुलांच्या मदतीने पत्नीने लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत पती मयत झाल्यावर त्याचे प्रेत राहत असलेल्याच पालात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पुरून टाकले . सदरची घटना गेल्या १०-१२ दिवसापुर्वी नाझरा ता.सांगोला येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. मयताच्या ३५ वर्षीय पत्नीने अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला व प्रेतास जमिनीत पुरून टाकले असल्याची मयताचे वडील बाबासाहेब पुंडलिक शिंदे रा . खानापूर ता . खानापूर जि . सांगली यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत सविस्तर हकीकत अशी की, नाझरे ता . सांगोला येथे गोसावी समाजाची काही कुटुंबे भंगार गोळा करून व भिक्षा मागून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत . आकाश बाबासाहेब शिंदे वय ३५ हे आपल्या पत्नी व दोन मुलासह राहण्यास होते . आकाश यास दारूचे व्यसन होते . त्यामुळे दारूच्या व्यसनास कंटाळून आकाश याची पत्नी कासाबाई शिंदे यांच्यात वारंवार भांडणे होत असत . गेल्या दहा - बारा दिवसापूर्वी कासाबाई हिने लाकडी दांडक्याने मयत आकाश शिंदे याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला . पत्नी व त्यांची दोन मुले गणेश शिंदे व जयश्री शिंदे यांनी प्रेत राहत असलेल्या पालात जमिनीत पुरून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.मयताचे वडील बाबासाहेब शिंदे यांनी सांगोला पोलिसात दिली आहे सांगोला पोलीस तपास अधिक तपास करीत आहेत
0 Comments