google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गाड्या देतो का मार खातो ? सावकाराचा अजब हिशोब !

Breaking News

गाड्या देतो का मार खातो ? सावकाराचा अजब हिशोब !


दहा लाखाचे बारा लाख दिलेच पण तरीही पाच लाख येणे आहेतच .. बावीस गाईही नेल्या आणि वर बुलेट, बोलेरो गाडीही सावकाराने जबरदस्तीने नेली.गाड्या देतो का मार खातो ?सावकाराचा अजब हिशोब


पंढरपूर : दहा लाखाचे बारा लाख परत देऊनही व्याज म्हणून गाड्या देतो का मार खातो असा अजब हिशोब करीत एका सावकाराने दमदाटीही केली आणि दोन वाहनेही नेल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथे घडली आहे. 

  पंढरपूर तालुक्यात बेकायदा सावकारी सतत सुरु असते आणि त्याच्या अशा घटना अधूनमधून ऐकायलाही मिळत असतात. अशाच प्रकारचा एक गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला असून संतोष गोरे यास अटकही करण्यात आली आहे. शेंडगेवाडी येथील शेतकरी धुळा रामचंद्र शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेंडगे यांनी संतोष किसान गोरे आणि त्यांच्या पत्नीकडून सन २०१७ मध्ये महिना पाच टक्के व्याज दराने दहा लाख रुपये घेतले होते. तीन टप्प्यात ही रक्कम धुळा शेंडगे यांना मिळाली होती. त्यानंतर शेंडगे यांनी टप्प्याटप्प्याने १२ लाख रुपये गोरे यास परत केले. यासह धुळा शेंडगे यांनी आपली २० गुंठे जमीन गोरे याना खरेदी करून दिली. एवढे होऊनही अजून रक्कम राहिली असल्याने गोरे यांनी तगादा लावला. आणखी ५ लाख रुपयांची रक्कम राहिली असल्याचे गोरे याचे म्हणणे होते. 

  आपण घेतलेली सर्व रक्कम व्याजासह परत केल्याचे शेंडगे सांगत असले तरी गोरे याला ते मान्य नव्हते. गोरे याने आपल्या २२ जर्सी गाई बळजबरीने नेल्या  आणि आणखी पाच लाख येणे आहे असे सांगत धुळा शेंडगे यांच्या नावावर असलेली बोलेरो गाडी आणि बुलेट मोटार सायकल ही दोन्ही वाहने व्याजाच्या पैशात दे, नाहीतर मार खावा लागेल अशा प्रकारची दमदाटी करून जबरदस्ती करून दोन्ही वाहने संतोष गोरे घेऊन गेला अशी फिर्याद धुळा शेंडगे यांनी पंढरपूर तालुका पोलिसात दिली आहे. तालुका पोलिसांनी संतोष गोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याचबरोबर गोरे यांनी नेलेली बुलेट आणि बोलेरो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे

Post a Comment

0 Comments