google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी

Breaking News

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी

 सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी केव्हा वठणीवर येणार . 


तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट तसेच अनागोंदी कारभार दिवसोंदिवस वाढत चालला आहे. कार्यालयातील कर्मचारी हे स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी मनमर्जीपणे सि.स.न.च्या उता-यावर चुकीच्या नोंदी घेत आहेत,बेकायदेशीर नकाशे तयार करून नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहेत. मा.न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत. शिवाय आपले पदीय काम स्वतः करण्याची तसदी न घेता ते काम झिरो कर्मचारी यांचे कडून करून घेत आहेत. 

त्यामुळे या कार्यालयातील दैनंदिन कामकाजाबद्दल वारंवार तक्रारी वाढत आहेत. उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालायातील या गैर कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.उप अधिक्षक कार्यालयातील कर्मचारी यांनी चुकीच्या नोंदी घेतल्यामुळे अनेक वेळा नागरिकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. व त्या वादातून हाणामारी सारखे प्रकार घडले आहेत. 

सांगोला तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट तसेच अनागोंदी कारभाराबाबत तालुक्यातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी या कार्यालयातील कामकाजाचा तातडीने आढावा घेऊन या कार्यालयात राजरोसपणे सुरू असलेला अनागोंदी कारभार बंद करून तालुक्यातील नागरिक दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावा . अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments