दि.27 : सांगोला येथील नगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे निवडीचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढून ते तहसीलदार अभिजित पाटील यांनी जाहीर केले.
अनुसूचित जाती,पुरुष अथवा महिला ग्रामपंचायती, यलमार, मंगेवाडी, गायगव्हाण, राजुरी, लक्ष्मी नगर,, सोनलवाडी, लोटेवाडी, कडलास
सात ग्रामपंचायत
अनुसूचित जाती महिला, संगेवाडी, वाणीचिंचाळे, हलदहिवडी, चिक-महूद, गौडवाडी, नाजरे, मांजरी, वाडेगाव
आठ ग्रामपंचायती
नागरिकाचा मागास प्रवर्ग, पुरुष अथवा महिला, धायटी, बलवडी, पारे, डिकसळ, खवासपूर, वाकी शिवणे, चिनके, बुरंगे वाडी, हंगिर्गे, आलेगाव
दहा ग्रामपंचायती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वझरे, कोळा, सोनंद, नराळे, अनकढाळ, मानेगाव, राजापूर, पाचेगाव खुर्द, खिलारवाडी, पाचेगाव बुद्रुक, जुनोनी
अनुसूचित जमाती, पुरुष अथवा महिला मेथोडे ग्रामपंचायत
सर्वसाधारण, पुरुष अथवा महिला, चिंचोली, शिरभावी, किडबिसरी, सावे, हातीद, कटफळ, कमलापूर, वाटंबरे, जवळा, शिवणे, जुजारपूर, सोमेवाडी, इटकी, बागलवाडी, निजामपूर, लोणविरे, आगलावेवाडी, वासुद देवळे महिम
सर्वसाधारण महिलांसाठी डोंगरगाव, हनुमंतगाव, गळवेवाडी, उदनवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, वाकि, घेरडी, महुद बुद्रुक, मेडशिंगी, घेरडी, आचकदाणी, बुद्ध विहार, एकतपुर, अकोला, तिप्पेहळी, चोपडी, अजनाळे, बामणी, हटकर, मंगेवाडी
तालुक्यात 76 ग्रामपंचायती असून त्यामध्ये सर्वसाधारण पुरुष ग्रामपंचायती 20 तर सर्वसाधारण महिलांसाठी 19 ग्रामपंचायती तसेच नागरीकांचा मागास प्रवर्ग या ग्रामपंचायतीत पुरुष अथवा महिला दहा ग्रामपंचायती तर नागरीकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील महिलांसाठी अकरा ग्रामपंचायत अनुसूचित जातीतील पुरुष अथवा महिलांसाठी सात ग्रामपंचायती तर महिलांसाठी आठ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी पुरुष अथवा महिला यासाठी एक ग्रामपंचायत आहे
तालुक्यातील नाझरे ग्रामपंचायती एकूण पंधरा सदस्य आहे त्यामध्ये शेकापचे 12 सदस्य तर महाविकास आघाडीचे तीन सदस्य आहेत येथे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी असून शेकापच्या 12 सदस्यांमध्ये एकही सदस्य अनुसूचित जातीचा नाही महाविकास आघाडी तीन सदस्य हे अनुसूचित जातीचे आहेत त्यामुळे सरपंच महाविकास आघाडीचा तर बहुमत शेकापचे असे चित्र राहणार आहे.
मानेगाव येथे सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकाचे मागास प्रवर्ग महिलासाठी आहे. येथे शेकापचे सात सदस्य तर महाविकास आघाडीचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. परंतु शेकापच्या सात सदस्यांमध्ये ओबीसी महीला नसल्याने महाविकास आघाडीकडे ओबीसी महिला असल्याने सरपंच पद महाविकास आघाडीकडे तर बहुमत शेकाप कडे असणार आहे
जवळा येथे 25 वर्षानंतर सर्वसाधारण पुरुष अथवा महिला या जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
0 Comments