सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला शहरातील नेहरु चौक येथील एस.एस.कम्युनिकेशन दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याची घटना २५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून १० लाख ६ ९ हजार ४४ रुपयांचे मोबाईल व अॅक्सेसरीज व १ लाख ६२ हजार रोख रक्कम वअसे एकूण १२ लाख ३१ हजार ४४ रुपयांचे ऐवज चोर नेला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , सांगोला शहरातील नेहरु चौक ते स्टेशन रोड दरम्यानच्या राजाराम कॉम्लेक्स मध्ये गाळा नं . ८ व ९ येथे विजय राऊत यांच्या मालकीचे एस एस मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे . २६ जानेवारीच्या पहाटे २ वाजण्याच्या आसपास दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी शटर तोडुन , तोडलेला भाग वाकवुन , दुकानात प्रवेश के ला . दुकानात असलेल्या आयफोन , सॅमसंग , नोकिया , विवो , ओप्पो , एमआय , रियलमी , कंपनीचे नवीन मोबाईल तसेच लिनोवो कंपनीचे २ टॅब , ब्ल्युथ , स्मार्ट वाँच , न्सुप , हेडफोन , ओटीजी , पॉवर बँक वगैरे अॅक्सेसरीज तसेच काऊंटरवरील एसर कंपनीचा लॅपटॉप , नोकिया कंपनीचे दोन जुने मोबाईल असा सर्व मिळून १० लाख ६ ९ हजार ४४ रुपयांचा माल व रोख १ लाख ६२ हजार असे एकुण १२ लाख ३१ हजार ४४ रुपये चोरुन नेले आहेत . सदर घटनेची सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत
0 Comments