google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रभाग क्र.4 मधील गटार व काँक्रीटीकरणच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

Breaking News

प्रभाग क्र.4 मधील गटार व काँक्रीटीकरणच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

 प्रभाग क्र.4 मधील गटार व काँक्रीटीकरणच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

सांगोला :शहरामध्ये प्रभाग क्र. 4 मधील पोपट रुपनर घर ते रियाज नदाफ घर ते किरण सपाटे घरापर्यंत आरसीसी गटार व रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचे भूमीपूजन शनिवारी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. 

पोपट रुपनर घर ते रियाज नदाफ घर ते किरण सपाटे घरापर्यंत आरसीसी गटार व रस्ता काँक्रीट करणे ह्या कामाचे अंदाजपत्रक 12 लाख 80 हजार रु. असून सदरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सदरचे काम हे खूप वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र तेथील नगरसेवक अस्मिर तांबोळी व नगरसेविका छायाताई मेटकरी यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

यावेळी बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेवक माऊली तेली, सोमनाथ ठोकळे, संजय लाळे, रियाज नदाफ, अनिल वाघमोडे, दत्ता तेली, ठेकेदार दिनेश येडगे यांच्यासह तेथील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments