google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कागदपत्रं जुळवाजुळवीसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ

Breaking News

कागदपत्रं जुळवाजुळवीसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत . राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे


. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत . ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर निघणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्यानिवडणुकीचा बिगुल वाजला आहे . एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे . अनेकांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे . कोण कोणाकडून निवडणूक लढवू शकतो याचे आडाखे बांधले जात असून मोठ्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत . त्यामुळे गावगाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे . सांगोला ६१ गावात गावगाडा चांगलाच तापणार आहे . पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे . | ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने गावोगावचे पुढारी आता तयारीला लागले आहेत . गावातील प्रमुख नेतेमंडळींच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत . गावातील सत्ताधारी व विरोधकांचे गट गावात सक्रिय झाले असून त्यांनी गावातील | संपर्क वाढवला आहे . काहींनी तर खर्च करण्याची सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहे . पुढाऱ्यांच्या घरी इच्छुक | उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा राबता वाढला आहे . ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर काढले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे . भागात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार आहेत . तसेच | यावेळी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे . आगामी काळात होणाऱ्या शेतकरी | सहकारी सूतगिरणी , खरेदी विक्री संघ , नगरपालिका , जिल्हा परिषद व पंचायत समिती यासह इतर निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे . राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सांगोला तालुक्यातील | जवळा , महूद , कोळा , घेरडी , | जुनोनी , हातीद , नाझरा , | कडलास , वासुद , अकोला , वाटंबरे , शिरभावी , वाटंबरे , अजनाळे , य.मंगेवाडी , चोपडी या | प्रमुख गावात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे .

Post a Comment

0 Comments