google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 थंड पाण्याचे जार विक्री उद्योग बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रक मंडळाचे आदेश

Breaking News

थंड पाण्याचे जार विक्री उद्योग बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रक मंडळाचे आदेश

 

थंड पाण्याचे जार विक्री उद्योग बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रक मंडळाचे आदेश

थंड पाण्याचे जार विक्री उद्योग बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रक मंडळाचे आदेश

साप्ताहिक शब्दरेखा एक्स्प्रेस :

शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना महाराष्ट्रातील थंड पाण्याची निर्मिती व जार विक्री करणारे बेकायदेशीर उद्योग (चिल्ड वॉटर जार युनिट्स ) बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाने दिले आहेत. 





राष्ट्रीय हरित प्राधिकरणात दाखल केलेल्या याचिकेवर १९ जुन २०२० रोजी झालेल्या निर्णयाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे (आयएएस) यांनी याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश काढला आहे. बेकायदेशीर थंड पाण्याची निर्मिती व जार विक्री करणारे उद्योग बंद केले जावेत यासाठी महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडलचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात धाव घेतली होती. डुबल यांच्या वतीने अँड.असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात काम पाहिले.

यापूर्वी शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना महाराष्ट्रातील थंड पाण्याची निर्मिती व जार विक्री करणाऱ्या बेकायदेशीर उद्योगाची (चिल्ड वॉटर जार युनिट्स ) माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिकांना दिले होते. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहेरे यांनी हा शासकीय आदेश काढलेला आहे.

Post a Comment

0 Comments