राज्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना सोमवार पासून भरपाई ; मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती ! भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार !
महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी ग्रस्ताना शेती व घराच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवार दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी पासून दिली जाणार आहे . नुकसान झालेल्या शेतकरी यांच्या बँक खात्यात थेत ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी ५ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले . ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येऊ नयेत म्हणून दिवाळीपूर्वीच ही मदत दिली जाणार आहे . सोमवार पासून याचे वाटप केले जाईल .
असे सांगून वडेट्टीवार म्हणाले की , राज्यात विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे . त्याची आचारसंहिता लागू झाली आहे . मात्र , आपत्तीच्या मदत वाटपाला आचारसंहितेची अडचण नसते . यापूर्वीही अशी मदत देण्यात आली आहे . आचारसंहिता काळात मदत वाटपा बाबत निवडणूक आयोगाकडून परवानगी दिली जाईल . अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकूण १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्यातील ५ हजार ५०० कोटी रुपये शेती व शेतघर , पशुधन व मृतांच्या वारसांना भरपाईपोटी दिले जाणार आहेत .
पश्चिम महाराष्ट्रातील ५७ हजार हेक्टर ,तर मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे . त्याचबरोबर कोकण व उत्तर महाराष्ट्रातील शेतीला ही फटका बसला आहे. अश्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता दिवाळीपूर्वी सर्व अतिवृष्टीग्रस्तांना मदत दिली जाईल , असेही मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले .
0 Comments