रेकॉर्ड (अभिलेख) विभागात झिरोंचा हैदोस ; नियम धाब्यावर बसवून नेमलेले झिरो करताहेत नागरिकांकडून मोठी आर्थिक लुट ; तहसीलदार यांचे साफ दुर्लक्ष !
by shabdhrekha express news on November 05, 2020 in तालुका प्रतिनिधी
सांगोला येथील रेकॉर्ड विभागात झिरो कर्मचारी यांचा हैदोस दिवसोंदिवस वाढत चालला आहे. या विभागात रोज एक नवीन झिरो भरती केला जात आहे. त्यामुळे शासकीय अभिलेखाच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या विभागात दिवसोंदिवस वाढत असलेली झिरो कर्मचारी यांची संख्या नागरिकांसाठी डोके दुखी वाढवणारी आहे. नागरिक या विभागातील जुनी कागदपत्रे काढण्यासाठी केलेले शेकडो अर्ज पेंडींग असताना काही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना तात्काळ कागदपत्रे काढून दिली जात आहेत. त्यामुळे अर्ज दाखल केलेले नागरिक दिवसोंदिवस या विभागापुढे ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच जे नागरिक आर्थिक तडजोड करत नाहीत त्यांना ना ना प्रकारची कारणे सांगितली जात आहेत.

व रेकॉर्ड विभागाचे कामकाज दरवाजा बंद करून केले जात आहे. अर्ज सादर करून नागरिक हैराण झाले आहेत. परंतु त्या नागरिकांना कागदपत्रे मिळत नाहीत. त्यांना या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या सर्व प्रकाराची कल्पना असतानाही तहसीलदार मात्र या गोष्टी कडे कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे च या झिरो कर्मचारी यांचे फावले आहे. हे झिरो कर्मचारी काही कर्मचारी, अधिकारी यांचेशी लगट करून या विभागात काम करत आहेत. हे रेकॉर्ड विभाग म्हणजे "आओ जावो घर तुम्हारा ' बनत चालले आहे. या विभागातील कामकाजावर कोणत्याही कर्मचारी, अधिकारी यांचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

0 Comments