google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नरेंद्र दोडके यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने उत्साहात साजरा

Breaking News

नरेंद्र दोडके यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने उत्साहात साजरा

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फाईट क्लबचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दोडके यांचा वाढदिवस काल सामाजिक कार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .


वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर , वृक्षारोपण कार्यक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असल्यामुळे नरेंद्र दोडके व त्यांच्या मित्रपरिवाराचे सांगोला शहर व परिसरातून कौतुक होत आहे . काल सकाळी रोजी जि.प.शाळा नं .३ , इंदिरानगर ( धनगर गल्ली ) सांगोला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या रक्तदान शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी गटनेते आनंदा माने , नगरसेवक अस्मिर तांबोळी , सुर्यकांत उर्फ टिकू मेटकरी , काशिलिंग ( बाबु ) गावडे , माजी नगरसेवक माऊली तेली , तायाप्पा माने , अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर यांच्यासह नरेंद्र दोडके मित्रपरिवार , फाईट क्लबचे सदस्य उपस्थित होते . या रक्तदान शिबीरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला . सदर रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास ५ लिटर कुकर व २० लीटर जार भेट देण्यात आला . रक्त संकलनाचे काम रेवनील ब्लड बँकेमार्फत करण्यात आले . सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालय परिसरातील बगीचामध्ये नरेंद्र दोडके यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.गटनेते आनंदा माने , मा . माऊली तेली , सोमनाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत

Post a Comment

0 Comments