google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : दिपकआबा साळुंखे पाटील

Breaking News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : दिपकआबा साळुंखे पाटील

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा : दिपकआबा साळुंखे पाटील 

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आदेशानुसार एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये 

सांगोला : तालुका प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. आधीच कोरोनाने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पावसाने झोडपल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिलेल्या आदेशानुसार एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. 

 गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या प्रचंड पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेतातील उभी पिके डाळिंब व इतर फळपिकांच्या फळबागा तसेच बाजरी मका व अन्य मळणीच्या प्रतीक्षेत रानात असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले शिवाय तालुक्यातील मान कोरडा बेलवण अप्रूका या प्रमुख नद्यांसह स्थानिक ओढे व नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडून हजारो एकर जमिनी वाहून गेल्या आहेत यामुळे आधीच कोरोनाशी दोन हात करत असलेल्या शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे 

या गंभीर बाबीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीने नुकसानग्रस्त सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत अजिबात दिरंगाई न करता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहावे 

अशा आपत्कालीन परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील असे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे कुणीही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत असे शेवटी दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments