Breaking News

सांगोल्याच्या राजमाता क्रिकेट ॲकॅडमीची दमदार कामगिरी! चार खेळाडूंची U-19 सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाच्या संभाव्य यादीत निवड

सांगोल्याच्या राजमाता क्रिकेट ॲकॅडमीची दमदार कामगिरी! चार खेळाडूंची U-19 सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाच्या संभाव्य यादीत निवड


सांगोला | प्रतिनिधी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत 

सांगोला येथील राजमाता क्रिकेट ॲकॅडमीच्या चार युवा खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 कु. ययाती देवकते, हर्षद विश्वकर्मा, अरुण जगताप आणि अतुल बिचुकले यांची १९ वर्षांखालील (U-19) संभाव्य सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे.

 या निवडीमुळे सांगोल्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या युवा खेळाडूंनी मिळवलेले यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक मानले जात आहे.

 त्यांच्या या यशामुळे राजमाता क्रिकेट ॲकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशाबद्दल सांगोला नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. आनंदा भाऊ माने साहेब आणि

 डॉ. अमरसिंह शेंडे (MS) साहेब यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना राजमाता क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजीत गवळी सर आणि अक्षय जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर या खेळाडूंनी हे यश मिळवले आहे.

या चारही खेळाडूंनी आगामी काळात आपल्या खेळात आणखी सुधारणा करून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उच्च स्तरावर यश मिळवावे,

 अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि सांगोला परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments