Breaking News

गणेशोत्सवातून सामाजिक ऐक्याचा संदेश; प्रियदर्शनी मंडळाच्या कार्याचे डीवायएसपी डॉ. शिवपूजे यांच्याकडून कौतुक जुने मारुती मंदिरातील गणरायाची डीवायएसपींच्या हस्ते महाआरती; हिंदू-मुस्लिम ऐक्याची वर्षानुवर्षांची परंपरा कायम

गणेशोत्सवातून सामाजिक ऐक्याचा संदेश; प्रियदर्शनी मंडळाच्या कार्याचे डीवायएसपी डॉ. शिवपूजे यांच्याकडून कौतुक जुने मारुती मंदिरातील गणरायाची डीवायएसपींच्या हस्ते महाआरती; हिंदू-मुस्लिम ऐक्याची वर्षानुवर्षांची परंपरा कायम


सांगोला / तालुका प्रतिनिधी : सण-उत्सव हे केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे माध्यम ठरू शकतात,

 याचे उदाहरण सांगोला शहरातील जुने मारुती मंदिर परिसरातील प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाने आपल्या कार्यातून जपले आहे. 

सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाची परंपरा अनेक वर्षांपासून जोपासणाऱ्या या मंडळाच्या कार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी कौतुक केले.

गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी डीवायएसपी डॉ. शिवपूजे यांनी प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळास भेट दिली.

 यावेळी त्यांच्या हस्ते जुने मारुती मंदिर येथील श्री गणरायाची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी बोलताना डॉ. शिवपूजे यांनी सांगितले की, प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाने गणेशोत्सवापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि बंधुभावाची परंपरा जपली आहे.

 विविध समाजघटकांना एकत्र आणणारे असे उपक्रम सामाजिक सलोख्यासाठी महत्त्वाचे आहेत.

मोहरमच्या परंपरेतूनही ऐक्याचा संदेश

प्रियदर्शनी मंडळाच्या कार्याची विशेष बाब म्हणजे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाबरोबरच मुस्लिम बांधवांचा मोहरम उत्सवही येथे श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो.

 मोहरमचे डोले (ताबूत) तसेच सवारी (पंजे) बसविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेत वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांचा सहभाग राहिला आहे.

विविध धर्मीय समाजघटकांच्या सहभागातून जपली जाणारी ही परंपरा परस्पर आदर, सहकार्य आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरत आहे. 

गणेशोत्सव, नवरात्र आणि मोहरम हे उत्सव सांगोल्यात शांतता व बंधुभावाच्या वातावरणात साजरे करण्यामध्ये मंडळाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

डीवायएसपींचा सत्कार

यावेळी शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब भाकरे, अरविंदभाऊ केदार, जितू साळुंखे तसेच शांतता कमिटीच्या वतीने बापूसाहेब ठोकळे, 

पत्रकार मिनाज खतीब, नासिर खतीब, शशिकांत कोळी, राजू इनामदार, फिरोज खतीब आदींनी डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपूजे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

महात्मा बसवेश्वर महाराज युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुमित चांदणे यांच्यासह काशिनाथ ढोले, संतोष महिमकर, प्रसाद जिरगे, निलेश लांमगुंडे, आकाश घोंगडे, 

सिताराम महिमकर, शिवानंद लोखंडे, अक्षय महिमकर, अजित गुळमिरे, नितीन बुंजकर, सुरज चांदणे, श्रीकांत गुळमिरे, जय गुळमिरे, श्रवण गुळमिरे आदी उपस्थित होते.

मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकारामतात्या गुळमिरे, प्रदीप गुळमिरे, अरविंद डोंबे गुरुजी, रमेश लोखंडे, अमर गुळमिरे सर, भारत घोंगडे, म.वी. सभेचे तालुकाध्यक्ष रत्नाकर पाटणे,

 आनंद घोंगडे, मनोज उकळे सर, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, माजी नगराध्यक्ष चंदन होनराव, महेश गुळमिरे, संजय कोठावळे, राहुल पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट :

सर्वधर्म समभावाची अनोखी परंपरा!

प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाबरोबरच मोहरम उत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. मोहरमचे डोले (ताबूत) आणि सवारी (पंजे) बसविण्यात

 वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांचा सहभाग असतो. विविध धर्मीय समाजघटकांचा सहभाग आणि परस्पर आदरातून जपली जाणारी ही परंपरा सांगोल्याच्या सामाजिक सलोख्याचे वेगळे उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments