Breaking News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ट्रकची धडक आणि आगीचा भडका, सांगोल्यातील ड्रायव्हरसह ट्रकचा कोळसा!

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ट्रकची धडक आणि आगीचा भडका, सांगोल्यातील ड्रायव्हरसह ट्रकचा कोळसा!


वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर दोन ट्रकच्या भीषण अपघातात झाला. 

अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये ट्रक चालकासह ट्रक जळून खाक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील वालई ते दोनद दरम्यान गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. दत्तात्रय खडतरे (राहणार सांगोला, जि.सांगली) 

असं मयत ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर भरधाव जाणाऱ्या ट्रकने 

त्याच लेनमध्ये पुढे असलेल्या लोखंडी रोल घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली.

धडक दिल्यानंतर ट्रकमधील लोखंडी रोल उसळले आणि ट्रकच्या केबिनवरून पुढे मार्गावर पडताना ट्रकची केबिन दबली गेली. 

त्याच दरम्यान ट्रक चालक दत्तात्रय खडतरे हे आत दबले गेले. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण शॉर्ट सर्किट झालं आणि ट्रकला भीषण आग लागली. 

अचानक आग लागल्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तो पर्यंत आगीने 

ट्रकच्या भक्षस्थानी सापडला. त्यामुळे ट्रकचालक दत्तात्रय खडतरे यांचासह ट्रक जळून खाक झाला.

या अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.

 अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच वेळेनंतर आग विझवण्यात आली.

 मात्र तोपर्यंत ट्रकचालक आणि ट्रकचा पूर्णतः कोळसा झाला होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments