Breaking News

सांगोला केसरी 2026 स्पर्धेचे आयोजन; कोसा खिल्लार स्पर्धेला 20 एप्रिल रोजी रंगत“सांगोल्याचे भाग्यविधाते आबासाहेब देशमुख; त्यांच्या स्मरणार्थ रंगणार भव्य खिल्लार स्पर्धा”

सांगोला केसरी 2026 स्पर्धेचे आयोजन;


कोसा खिल्लार स्पर्धेला 20 एप्रिल रोजी रंगत


“सांगोल्याचे भाग्यविधाते आबासाहेब देशमुख; त्यांच्या स्मरणार्थ रंगणार भव्य खिल्लार स्पर्धा”

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, विक्रमवीर आमदार स्व. गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या स्मरणार्थ खिल्लार 

संगोपन व संवर्धन उपक्रमांतर्गत भव्य दिव्य कोसा खिल्लार स्पर्धा – ‘सांगोला केसरी 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता सांगोला–मिरज हायवेवरील अनकडाळ टोल नाक्याजवळ पार पडणार आहे. 

या स्पर्धेत गायी, बैल तसेच कालवड गटांसाठी विविध प्रकारचे गट ठेवण्यात आले असून प्रत्येक गटात आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेत गाई गट, बैल गट, कालवड गट यांसह 2 दाती, 4 दाती, 6 दाती तसेच जुडक (जोडी) गटांचा समावेश करण्यात आला आहे. 

प्रत्येक गटात प्रथम क्रमांकासाठी आकर्षक चांदीची गदा व रोख पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठीही रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी प्रवेश फी 500 रुपये ठेवण्यात आली असून, स्पर्धा पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

आयोजन अनकडाळ ग्रामस्थ व नारायणी प्रेमी सांगोला यांच्या वतीने करण्यात येत असून, नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

 खिल्लार जातीच्या जतन व संवर्धनासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेमुळे सांगोला परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक सहभागी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments