आंबेडकरी चळवळीतील दोघांना नामदार रामदासजी आठवले साहेब व ज्योती नागनाथ वाघमारे राज्य सभेची उमेदवारी
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस असताना...आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या दोघांना राज्य सभेची उमेदवारी जाहीर झाली असुन त्यामध्ये...
१)नामदार रामदासजी आठवले साहेब (तिसरी टर्म २) ज्योती नागनाथ वाघमारे या दोघांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांना खासदार म्हणून लवकरच घोषीत करण्यात येईल... आयुष्याम रामदास आठवले साहेब हे दलीत पॅंथरचे संस्थापक होते.
सध्या ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्वेसर्वा आसुन त्यांनी राज्याच्या मंत्री मंडळात सुध्दा काम केले असुन सध्या ते केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत ... तर ज्योती वाघमारे या सुध्दा आंबेडकरी चळवळीतील अग्रगंण्य नेत्या आहेत
त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे सुध्दा दलीत पँथरचे प्रमुख नेते होते...ज्योती वाघमारे यांचा आंबेडकरी चळवळीवर गाढा अभ्यास असुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी अनेक व्याख्याने गाजवली आहेत...
काही वर्षापुर्वी महुद बु!! येथील जयंती महोत्सवाच्या व्याख्यान मालेतील त्यांचे व्याख्यान प्रभावी झाले होते ..तशी त्यांची अनेक व्याख्याने प्रभावी असतातच... आंबेडकरी चळवळीतील या दोंन्ही नेत्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
जय भिम,जय भारत,जय संविधान


0 Comments