google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “चेतनसिंह केदार सावंतांना सभापतीपद; माढ्यात 3 पदे देत गोरेंचा राजकीय डाव रंगला!”

Breaking News

“चेतनसिंह केदार सावंतांना सभापतीपद; माढ्यात 3 पदे देत गोरेंचा राजकीय डाव रंगला!”

“चेतनसिंह केदार सावंतांना सभापतीपद; माढ्यात 3 पदे देत गोरेंचा राजकीय डाव रंगला!”


सोलापूर : जिल्हा परिषदेत सभापतीपदांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

 27 मार्च रोजी जाहीर झालेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदांतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मिशन माढा’ची रणनीती उघडपणे दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे.

या निवडीत माळशिरसच्या संस्कृती सातपुते, दक्षिण सोलापूरचे रामप्पा चिवडशेट्टी, माढ्याच्या ॲड अमृता वाघे आणि

 सांगोल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांना सभापतीपदाची संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, 

यातील तीन सभापतीपदे थेट माढा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात देण्यात आली आहेत, तर उर्वरित पदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ मध्ये आहेत.

सत्ता भाजपकडे, लक्ष्य माढा

सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष ने 68 पैकी 38 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 

अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांची निवड झाली आहे. 

बार्शीला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.

माढ्यातील पराभवाची भरपाई?

मागील लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करत माढा मतदारसंघ जिंकला,

 तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला. हा धक्का पक्षासाठी मोठा मानला गेला होता. 

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरची जबाबदारी गोरे यांच्याकडे सोपवली होती.

पंचायत समित्यांपासून झेडपीपर्यंत भाजपचा दबदबा

गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्ह्यातील अकरापैकी दहा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली.

 पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का देण्यात गोरे यशस्वी ठरले आहेत.

पुढील रणनीती स्पष्ट

सभापती निवडीतून स्थानिक पातळीवर मजबूत नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न दिसतो. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क वाढवून

 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचा भाजपचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

एकंदरीत, झेडपी सभापती निवड ही केवळ पदांची वाटप नव्हे, तर ‘मिशन माढा’च्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे राजकीय पाऊल असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments