google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले, सोलापुरात खळबळ....

Breaking News

सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले, सोलापुरात खळबळ....

सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले, सोलापुरात खळबळ....


अक्कलकोट तालुक्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंगळगी गावातील शेतात जावयाने सासऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार चाकूने वार करत त्यांची हत्या केली. 

त्यानंतर जावईने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील रुग्णालयात जावयावर उपचार सुरू आहेत.घटनेत मृत व्यक्तीचे नाव सिकंदर मुलका शेख असे आहे तर आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असे आहे.

 याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सादिक दफेदार याने शेतात सिकंदर शेख यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments