google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा निमित्त अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा निमित्त अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा


निमित्त अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला / प्रतिनिधी - शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला मध्ये जिमखाना डे व पारितोषिक 

वितरण सोहळा निमित्त अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सकाळी ९:०० वाजता पारंपरिक वेशभूषा दिन हा कार्यक्रम साजरा झाला. 

त्यानंतर सकाळी १०:०० वाजता फनी गेम्सचे उदघाटन संस्थेचे संचालक प्रा. अशोक शिंदे, प्रा.दिपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी,

 जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा कमिटीचे चेअरमन प्रा. अशोक कांबळे यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 दुपारी १२ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केलेल्या होत्या.  

         दुपारी २:०० ते ५:३० या वेळेत पहिल्या दिवसातील मुख्य कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उदघाटन संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, सांगोला पोलीस स्टेशनचे 

महिला पोलीस अधिकारी  कु. स्नेहल चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, 

सांस्कृतिक कार्यक्रम कमिटीचे चेअरमन प्रा.धनाजी भानवसे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लावणी, पोवाडा, सोलो डान्स असे विविध नाट्य प्रकार संपन्न झाले.

 सदर कार्यक्रमाध्ये कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त  सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments