google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जवळा ते डिकसळ रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे.संबंधित बांधकाम विभाग मात्र तोंडावर बोट हाताची घडी,

Breaking News

जवळा ते डिकसळ रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे.संबंधित बांधकाम विभाग मात्र तोंडावर बोट हाताची घडी,

जवळा ते डिकसळ रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे.संबंधित बांधकाम विभाग मात्र तोंडावर बोट हाताची घडी, 


ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे. त्या ठेकेदाराला,आबा मोटेंचा फोन राहीलेले खड्डेही बुजवणार ठेकेदार : मोहन बाबर

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोल ःजवळा भोपसेवाडी ते डिकसळ नराळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने, अक्षरश : रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. या अगोदर रस्त्यावर खड्यात मोठ मोठे अपघात ही झाले आहेत.परंतू 

रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम चालू असून, निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे .एक खड्डा बुजवने तर बाजूस खड्डे जैसे थे तैसे ठेवणे.अशी परिस्थीती त्या ठेकेदाराकडून होत आहे. त्या डिकसळ भागातील नागरिकांना समजताच त्या संबंधित अधिकार्‍यांला व ठेकेदाराला 

त्या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, म्हणून फोन करून सांगितले असता, अधिकारी व ठेकेदार बोलतात की, त्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे 7 ते आठ लाखांचे इस्टीमेन आहे,त्या पैशात भागत नाही , उडवाउडवीची उत्तरे देतात.

 या कामाची माहिती डिकसळमधील ग्रामस्थांनी आबा मोटे यांना दिली. माहीती समजताच मोटे यांनी संबंधित अधिकार्‍याला व त्या ठेकेदाराला चांगलीच समज दिल्याने त्यांना वेळीच जाग आली. राहीलेले खड्डे बुजवून घ्यावीत अशी विनंती 

केल्याने, ठेकेदाराकडून राहीलेले खड्डे बुजवून देतो असे आश्‍वासन दिल्याने नागरीकांडून आबा मोटे यांच अभिनंदन केले जात आहे.तरी या अगोदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याबाबत सुज्ञ नागरिकांनी 

अनेकवेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागाचे अभियंता मात्र शासकीय कार्यालयात डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत असल्याने त्यांच्या कामकाजाबाबत संतापाची नागरिकामधून लाट उसळली आहे.

जागोजागी खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. दरम्यान या रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा

 खड्ड्यात मोटर सायकल गेल्याने त्याला जीवही गमवावा लागला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र तोंडावर बोट हा ताची घडी अशा स्थितीत कामकाज करत असल्याने त्यांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त केला जात आहे. श्री

शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्या कर्तव्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सांगोला शहरापासून ते कडलास जवळा मार्गे भोपसेवाडी डिकसळ ते नराळे च्या

 हद्दीत शेकडो खड्डे रस्त्यावर छोटे मोठे पडल्याने या रस्त्याची अवस्था भयानक झाल्यामुळे मोटर सायकल सारखे वाहन सुध्दा तिसर्या गीअर ऐवजी दुसर्या गीअरवर चालवत जाण्याची वेळ येत आहे.

ग्रामीण भागातील सर्वच रस्त्याची शोचनीय अवस्था व ग्रामीण भागातील इतर रस्ते यांची अवस्था अत्यंत खराब असून पंख्याखाली कार्यालयात बसून राहणारे 

अधिकारी ग्रामीण भागात फिरकत नसल्यामुळे या रस्त्याची त्यांना जराही परिस्थिती माहित नसल्याचे समजते. एकीकडे तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी 

आल्याचे सांगीतले जाते. मात्र रस्ते अद्यापही जैसे थे स्थितीत असल्यामुळे आलेला निधी मग कोठे जातोय? असा संतापजनक सवाल ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत. या खराब झालेल्या रस्त्यामुळे तालुक्याला येणे नागरिकांना अशक्य होत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे 

एस.टी महामंडळाच्या बसेसही खिळखिळ्या होत असल्याचे सांगण्यात येते. खराब रस्त्यामुळे ग्रामीण भागात एस.टी. घेवून जाण्यास चालकही नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच खराब रस्त्यामुळे बस मधून प्रवास करणार्या प्रवाशांच्या मणक्याचा त्रासही उद्भवत 

असल्याचे काही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा संतापजनक सवालही या खराब रस्त्यामुळे नागरिकामधून विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments