google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

Breaking News

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 'स्वच्छ सर्वेक्षण 2026' व 'माझी वसुंधरा 6.0' अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे 

औचित्य साधून सांगोला नगर परिषदेमार्फत विविध स्पर्धा तसेच ' होममिनिस्टर - खेळ पैठणीचा' यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

 • दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता

 पाककला स्पर्धा तसेच दुपारी 2.00 वाजता ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाक कला स्पर्धेचा विषय 

मूग व हुलगा यापासून बनवलेल्या चविष्ट ,पौष्टिक, रुचकर पदार्थ* तसेच पाक कलेतील

 स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना रक्कम रुपये 5001 ,3001,2001 प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह  ग्रुप डान्स स्पर्धेचा विषय 

भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब /सामाजिक संदेश ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रत्येकी 

पहिल्या तीन क्रमांकांना  रक्कम रुपये 7001,5001, 3001  प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीसही दिले जाणार आहेत.

 दिनांक 9 मार्च 2026 रोजी 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा', लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन दुपारी 12 वाजता   करण्यात आले आहे.

 वरील सर्व कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन ( टाऊन हॉल )* येथे होणार आहेत.

 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7972100365,7709092241 या नंबर वर नाव नोंदणी करावी .

तरी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन 

सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. छायाताई मेटकरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.आनंदाभाऊ माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments