google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी-दीपक आबा साळुंखे पाटील

Breaking News

सांगोला येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी-दीपक आबा साळुंखे पाटील

सांगोला येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी-दीपक आबा साळुंखे पाटील 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी ): शिक्षकांच्या समस्या जाणून तत्परतेने मदतीसाठी सहकार्य करणाऱ्या दीपक आबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे सांगोला येथे जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे कार्यालयात

 पतसंस्थेच्या वतीने विविध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले संस्थेचा कारभार पारदर्शक असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे संस्था स्थापनेपासून प्रत्येक वर्षी पुरस्कार वितरण करणारी तालुक्यातील एकमेव संस्था आहे 

या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी मला उपस्थित राहण्याचे संधी मिळते हे माझे भाग्य आहे यावेळी संस्था स्थापन करणेची कल्पना माझेकडे घेऊन आलेले गुलाबराव पाटील, केशवराव घोडके यांचा मनोगतातून आबांनी आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साने गुरुजी कथामाला सांगोलाचे अध्यक्ष भीमाशंकर पैलवान सर यांनी भूषवले व आपल्या मनोगतातून साने गुरुजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षक बांधवाने आदर्श पिढी घडविणेचे

 काम अखंडपणे सेवाव्रती या भावनेने करीत रहावे पुरस्कारने शिक्षकांची उंची वाढते संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.माजी अध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन आवताडे यांनी केले . 

यावेळी सौ.जयमालाताई गायकवाड , गटशिक्षणअधिकारी सुयोग नवले , सुहास कुलकर्णी व पुरस्कार प्राप्त शिक्षकवृंदातून संभाजी पवार, ज्योती पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 मान्यवरांच्या उपस्थितीत सभासद पाल्य गुणवंत विद्यार्थी ,आदर्श शिक्षक उपक्रमशिल शाळा पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शिल्ड, प्रमाणपत्र, शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वभंर लवटे, बाबासो इंगोले यांनी केले उपस्थित मान्यवर सभासदांचे आभार संजय गायकवाड यांनी मांडले कार्यक्रम स्थळी सुरेख लक्ष्यवेधी अशी रांगोळी साठी साविञा कस्तुरे – हवेली यांचे योगदान मिळाले.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन विलास डोंगरे ,व्हा,चेअरमन गोविंद भोसले शिक्षक नेते विकास सांळुखे-पाटील ,तानाजी खबाले, वसंत बंडगर ,वसंत दिघे, 

सिध्देश्वर झाडबुके ,प्रतिभा शेंडे ,कमल खबाले ,वसंत नवले ,दिलीप घाडगे , विजयकुमार इंगवले, संतोषकुमार निंबाळकर माणिक मराठे उपस्थित होते तद्नंतर सुयोग नवले

 (आदर्श विस्तार अधिकारी) ,मल्लया मठपती (आदर्श क्रेंद्रप्रमुख) ,अनुरथ कोळेकर (आदर्श मुख्याध्यापक) , रावसाहेब सुरवसे ,शंकर बापू सावंत (जीवनगौरव)शंकर कांबळे ,नागनाथ वठारे ,अण्णासाहेब गावडे ,ज्योती पवार ,अशोक शिंदे ,

वनिता गुत्तेदार, सिताराम शिंदे, धनंजय इंगोले पाटील , सुनिता बाबर ,वंदना बनसोडे ,दौलतराव खंडागळे ,मुस्ताक जमादार, तातोबा कांबळे ,लखन कांबळे, यशवंत फेरे, दामाजी माळी ,किरण कलुरकर, पंकज कांबळे, बापूसाहेब मिसाळ ,सुभाष क्षिरसागर, 

धन्यकुमार बदाले, संभाजी पवार, अतुल इंगवले, तब्बसूममौला मुलाणी, पंकज मसगौड सर्वजण आदर्श शिक्षक व विशेष सत्कारमूर्ती बापूसो.भंडगे आणि उपक्रमशिल आदर्श शाळा म्हणून जि.प.प्रा.शाळा कोळी-सांळुखेवस्ती (जवळा), मेटकरवाडी (शिरभावी) 

,शेळकेवाडी (शिवणे ),बुध्देहाळवाडी (चोपडी ) ,केशव घाडगेवस्ती (हातीद), यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद संचालक, शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments