राजकीय घडामोडीला वेग! 'या' पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड;
'या' तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये सध्या नूतन नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, रविवार, दि.१८ जानेवारीपूर्वी नूतन उपनगराध्यक्षांची निवड करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.
दि.१८ जानेवारीपूर्वी नूतन उपनगराध्यक्षांच्या निवडी होणार असून, २० जानेवारीनंतर नगरपालिकांच्या विशेष समित्यांच्या निवडी जाहीर होतील.
तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक हात उंचावून मतदान करणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नूतन नगराध्यक्षांना पदभार स्वीकारण्याच्या सूचना केल्या असून, तसे आदेशही त्यांनी दिले आहेत.
त्यानंतर नगरपालिका प्रशासनाधिकारी योगेश डोके यांनी नूतन उपनगराध्यक्षांची निवड जाहीर करण्याची सूचना केली आहे.
नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून सध्या नूतन नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याची कायदेशीर प्रक्रिया राबविली जात आहे.
त्यानंतर उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर विशेष समित्यांच्या नियुक्त्या होतील, असेही डोके यांनी सांगितले.


0 Comments