ब्रेकिंग न्यूज.. सांगोला शहरातील शिवाजीनगर परिसरात चोरीचा प्रयत्न;
चोर सीसीटीव्हीत कैद पोलिस गस्त नसल्याने नागरिकांत भीती
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला शहरातील शिवाजीनगर येथील शाळेजवळ परवा रविवारी रात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून,
सदर चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रात्री उशिरा
संशयास्पद हालचाली करत एक इसम परिसरात फिरत असल्याचे स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
या घटनेमुळे शिवाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त
नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले आहे. शाळा, वसाहत आणि रहिवासी भाग असतानाही पोलिस गस्त नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची नागरिकांची भावना आहे.
यापूर्वीही या परिसरात चोरीचे व संशयास्पद प्रकार घडले असून,
तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा,
तसेच रात्रीच्या वेळेस नियमित पोलिस गस्त सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात,
अन्यथा नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता भेडसावत राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


0 Comments