google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात आठ जणांना तिरट जुगार खेळताना रंगेहाथ पकडले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

Breaking News

सांगोला तालुक्यात आठ जणांना तिरट जुगार खेळताना रंगेहाथ पकडले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

सांगोला तालुक्यात आठ जणांना तिरट जुगार खेळताना रंगेहाथ पकडले पोलीस निरीक्षक विनोद घुगे


यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला तालुक्यात बेकायदेशीर जुगारावर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत 

मौजे अजनाळे (ता. सांगोला) येथे सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तिरट नावाचा जुगार खेळत असताना आठ इसमांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.35 वाजण्याच्या सुमारास अजनाळे गावातील ठिकाणी आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. यामध्ये कैलास देवराव पवार व कल्याण शंकर जाधव

 (रा. जयकवाडी कॅम्प, जि. बीड - सध्या रा. अजनाळे) यांच्यासह दादासो भडांगे, गुलाब भडांगे, भारत भडांगे, तुषार धोंडोरे, दत्तात्रय चौगुले व भालचंद्र चौगुले (रा. मंगेवाडी, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पो.कॉ. उमेश डोळस यांनी फिर्याद दिली असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सांगोला परिसरात अवैध धंदे, जुगार व समाजविघातक कृत्यांविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे. 

या कारवाईमुळे परिसरात जुगार चालविणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments