google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात..चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

Breaking News

भीषण अपघात..चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

भीषण अपघात..चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला;


ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

दिघंची : वळण घेताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथील ढोले मळा-मोरे मळा कॅनॉल फाट्याजवळ घडली.

 ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.राजेवाडी येथील गणेश बनपट्टे (वय २३) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

या अपघातातील जखमीला आणण्यासाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचा देखील त्याच ठिकाणी वळणाचा अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये पडल्याने अपघात झाला. 

यामध्ये सागर घोडके हे रूग्णवाहिकेचे चालक गंभीर जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी राजेवाडी मधील युवक गणेश बनपट्टे हा ट्रॅक्टर घेऊन ढोले मळा येथे येत

 असताना ढोले मळ्याजवळ असणाऱ्या कॅनॉल जवळ ट्रॅक्टर पलटी झाला. 

यावेळी ट्रॅक्टरच्या खाली गणेश बनपट्टे हा चालक सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्याचे समजताच दिघंची मधील रूग्णवाहिका बोलवण्यात आली. यावेळी अपघातस्थळी वळणाचा अंदाज न आल्याने 

रूग्णवाहिका कॅनॉलमध्ये पडून अपघातग्रस्त झाली. यामध्ये सागर घोडके हे चालक गंभीर जखमी झाले.

चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला

राजेवाडी येथील मयत गणेश बनपट्टे या युवकाचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गणेश बनपट्टे यांचा मृत्यू झाल्याने राजेवाडी गावावर शोककळा पसरली 

तर त्याच ठिकाणी रूग्णवाहिकेचा देखील दुर्दैवी अपघात झाल्याने सागर घोडके हा युवक गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments