धक्कादायक! जमिनीच्या वादातून माजी सरपंचाचा खून;
महिलेने गयावया केली पण गुंडांचं टोळकं घाव घालतच राहिलं
जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे
माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली.ही घटना छत्रपती संभाजीनगर जवळील ओव्हरगावच्या गावात घडली आहे.
एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या,
लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घा घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत.
इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू,
हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या
गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची बुधवारी दुपारी क्रूरपणे हत्या केली.
एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र
लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत.
छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात
पठाण यांचे कुटुंब मूळ ओव्हरगातचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.
'कानून हमारें हाथ में है'
इम्रान व अफरोजचे पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे. सुरुवातीला त्यांनी दादांची मुले अफसर व जुबेर यांच्यावर हल्ला चढवला.
त्यांच्या पत्नींनी दोघांना आत नेत कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावले. त्या विनवण्या करत होत्या. तरीही हल्लेखोर कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते.
'कानून हमारें हाथ में है' असे म्हणत त्यांनी दादा पठाण यांना लक्ष्य केले. शिवाय, स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली.



0 Comments