खळबळजनक..सांगली येथे अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार;
पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार
ती विवस्त्र रस्त्यावर धावत होती अन् लोक तिला.; सामुहिक बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी
एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी पाशवी
अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले.
१६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास, उरुण ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील
बाजूस असलेल्या एका ऊसाच्या शेतात ही घटना घडली.संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले.
तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते.
याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून
आज दुपारी ४.२६ वाजण्याच्या दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.आशिष जयवंत खांबे (वय २६, रा. खांबे मळा,
ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे (वय २७, रा. आष्टा नाका, ईश्वरपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच
पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.


0 Comments