सांगोला तालुक्यात महिमच्या सरपंचपदी मा.वसंत रुपनर यांची बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महूद : महिम (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या वसंत रुपनर बिनविरोध निवड झाली आहे. यांची वसंत रुपनर अण्णासाहेब कोळेकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या
सरपंच पदाच्या निवडीसाठी महिम ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. महदचे मंडल अधिकारी पी. एस. जाधव हे या सभेला अध्यासी अधिकारी म्हणून उपस्थित होते. आज झालेल्या सरपंच निवडीसाठी शेतकरी
कामगार पक्षाचे वसंत रुपनर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी पी. एस. जाधव यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन नारनवर, अण्णासाहेब कोळेकर, शंकर चौगुले, आबा कारंडे, सुरेखा महापुरे, आशाबाई पाटील, सुरेखा शेंडे, लक्ष्मी चौगुले, शकुंतला शिरगिरे, शिवाजी गोरवे,
राणूबाई सावंत, स्वाती रुपनर हे १५ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.


0 Comments