खळबळजनक! लग्नासाठी वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप;
पंढरपूर न्यायालयाचा निर्णय; 'एवढे' हजार रुपये दंडाची शिक्षा
एका तरुणाने “तू माझे लग्न करीत नाही, तुला आता ठेवत नाही,” असे म्हणून घराच्या समोर पडलेली फरशी व लाकडाच्या तुकड्याने वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी आरोपी गोपीचंद उर्फ जितू हुकूम कदम (वय २८, रा. सांगोला रोड, पंढरपूर) याला शुक्रवारी पंढरपूर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी जन्मठेप कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान आरोपी गोपीचंद याने वडील हुकूम कदम यांच्याकडे डोळे वठारून पाहून “तू माझे लग्न करीत नाहीस, तुला आता ठेवत नाही”, असे म्हणाला.
तसेच घराच्या समोर पडलेला फरशीचा तुकडा हातात घेऊन त्याने वडील हुकूम यास मारहाण केली.
हुकूम कदम यांचा उपचारादरम्यान २८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सपोनि प्रकाश भुजबळ यांनी तपास केला.
सरकारी वकील म्हणून फिरोज शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून सपोफौ रवींद्र बनकर यांनी काम पाहिले आहे.


0 Comments