google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद निवडणुकीत ७७.७० टक्के मतदान निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी

Breaking News

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत ७७.७० टक्के मतदान निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत ७७.७० टक्के मतदान निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी


सांगोला - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदासाठी मंगळवार 

दि.२ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.सकाळी साडेसात वाजल्यापासून शहरातील ४० मतदान केंद्रावर मतदान सुरळीतपणे सुरू झाले.

सकाळी साडेनऊ वाजता ५.७९ टक्के, साडेअकरा वाजता १७.४६ टक्के, दुपारी दीड वाजता ३१.६१ टक्के, साडेतीन वाजता ४८.८७ टक्के तर एकूण ७७.७० टक्के मतदान झाले

 असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली. एकूण ३३ हजार ६९८ मतदारांपैकी १३ हजार १९९ पुरुष व १२ हजार ९८३ महिला अशा एकूण २६ हजार १८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती सहा.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली. दुपारनंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी दिसून आली.

 सदर नगरपरिषद निवडणुकीसाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फोटो ओळ - सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-प्रभाग क्र.२, मतदान केंद्र क्र.३ येथे सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी झालेली महिला मतदारांची गर्दी.

Post a Comment

0 Comments