प्रेमात धोका मिळला; तृतीयपंथाची गळफास घेऊन आत्महत्या, सोलापूर परिसर हादरलं
सोलापूर: प्रियकराच्या विश्वासघातामुळे एका तृतीयपंथीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपली वेदना व्यक्त केली.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव प्रकाश कोळी असे आहे. गेल्या 8 वर्षांपासून तो आपल्या प्रियकर सुजीत जमादार याच्यासोबत राहत होता.
या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र सुजीत लवकरच दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे प्रकाशच्या लक्षात आल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रकाश आणि सुजीत यांचे 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, परंतु समाजातील दडपणामुळे या नात्याबद्दल फार वाच्यता नव्हती. एकीकडे प्रेमसंबंध टिकून असतानाही सुजीतने अचानक दुसऱ्या मुलीसोबत लग्नाचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे प्रकाशला मानसिक धक्का बसला. त्याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने आपली भावना आणि वेदना मांडल्या.
दरम्यान, सुजीतने प्रकाशकडील सोनं आणि पैसे घेतल्याचा आरोप प्रकाशच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकाशला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
या घटनेनंतर सोलापूर जिल्हा रुग्णालय परिसरात तृतीयपंथीय समुदायाची मोठी गर्दी जमली आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


0 Comments