खळबळजनक! अल्पवयीन मुलीला कॅफेत नेऊन सोन्याचे दागिने पळवले;
फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल; मंगळवेढ्यात तरुणाविरुद्ध गुन्हा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मंगळवेढा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील कॅफेमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन
सोन्याचे दागिने लंपास केले.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी शिवम विलास चव्हाण (रा. सुस्ते, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीशी आधी ओळख वाढवली.
त्यानंतर दि.८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मंगळवेढा शहरातील एका कॅफेत नेले.
लग्नाचे आमिष दाखवून तेथे नमूद तरुणाने स्वतः समवेत मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी काढला. यानंतर 'तुझ्याजवळील सोन्याचे सर्व दागिने मला दिले नाहीस,
तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन,' अशी धमकी देत पीडितेकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याचे
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि गिरीष जोग हे करीत आहेत.


0 Comments