सांगोला तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी केले ऑनलाइन कामकाज बंद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - सांगोला तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी सोमवार दि.१५ डिसेंबर पासून कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटर बदलून देण्याची मागणी करत
आपापली डीएससी तहसील कार्यालयात जमा करून ऑनलाईन कामकाज पूर्णतः बंद करून आंदोलनास प्रारंभ केला आहे.
याबाबत सांगोला तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शासन निर्णयानुसार नवीन लॅपटॉप व प्रिंटरची जीइएम
पोर्टलद्वारे खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करून सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिका-यांना ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत,
कालबाह्य उपकरणांच्या विल्हेवाट प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी, खरेदी प्रक्रियेतील अनावश्यक विलंबाबाबत विभागीय स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम कालबाह्य व नादुरुस्त उपकरणावर काम करताना कामकाजाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
तसेच नवीन भरतीत आलेले अधिकाऱ्यांना ही संगणकीय साधने उपलब्ध नाहीत. याचा क्षेत्रीय कामकाजावर परिणाम होत आहे.
-हरिश्चंद्र जाधव, अध्यक्ष, सांगोला तालुका तलाठी संघ


0 Comments