Breaking News

धक्कादायक...सोनंद येथे मोटार चालू करताना शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू

धक्कादायक...सोनंद येथे मोटार चालू करताना शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : शेतात विहिरीवरील पाण्याची मोटर चालू विजेचा करताना शॉक शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास सोनंद

 (ता. सांगोला) येथे घडली. संजय नारायण काशीद (वय ४९, रा. सोनंद, ता. सांगोला, सध्या रा. सांगोला) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

संजय काशीद लागून प्राथमिक संजय काशीद हे सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक

तर शिक्षक संघाचे उपाध्यक्ष होते तसेच मानेगाव हायस्कूलच्या उपशिक्षिका सुवर्णा काशीद यांचे ते पती होत. याबाबत सुभाष जगन्नाथ काशीद यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संजय काशीद हे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास सोनंद येथील शेतातील विहिरीवरील मोटार चालू करीत होते.

 यादरम्यान विजेचा शॉक लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. मुलगा संजय यास शॉक बसताच आईवडिलांनी आरडाओरड केली. 

नातेवाईक सुभाष काशीद यांनी तातडीने घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments