भारतीय जनता पार्टी मधून चोपडी जिल्हा परिषद निवडणूक
इच्छुक उमेदवार श्री प्रशांत वलेकर पार्टी संधी दिली तर त्याच सोन करणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
चोपडी गट cha कायापालट करणार
चोपडी: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
चोपडी गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. प्रशांत वलेकर यांनी आपली उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कार्यात सक्रिय असलेल्या वलेकर यांनी जनसंपर्क वाढवला
असून, त्यांना जर पक्षाने संधी दिली तर ते या संधीचे सोने करतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
"चोपडी गटाचा कायापालट करणे आणि रखडलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझे मुख्य ध्येय आहे," असे
वलेकर यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे तरुण वर्गात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



0 Comments