अशोक कामटे संघटनेच्यावतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. मिश्रा यांना निवेदन
स्टेशनच्या वर्तुळाकार क्षेत्रातील काम निकृष्ट दर्जाचे:– अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने रेल्वेच्या समस्या व विविध मागण्या विषयीचे निवेदन
सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांना सांगोला दौऱ्यात निवेदन देण्यात आल्याची माहिती अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी दिली.
या निवेदनात सांगोला रेल्वे स्टेशन परिसरात सर्कुलेट एरियामध्ये रस्त्याचे जे कॉंक्रिटीकरण काम केले आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले
असून त्यामुळे दररोज येणाऱ्या– जाणाऱ्या प्रवाशांना धुळीचा त्रास होत असून याप्रकरणी संबंधित कामाची व ठेकेदाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 प्रमाणे 2 ची लांबी वाढवण्यात यावी स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा द्यावी व सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे रेल्वे क्रमांक 11027 व 11028 दादर– सातारा –दादर रेल्वे दररोज सुरू करण्याकरता आपल्या स्तरावरून वरिष्ठ कार्यालयास तसा प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी.
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची लांबी कमी असल्याने एक्सप्रेस गाडी आल्यावर पूर्णपणे या प्लॅटफॉर्मवर येत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
कोच इंडिकेटरची सुविधा नसल्याने प्रवाशांना डब्याची संरचना समजण्यात अडचणी येत आहेत व सातारा– दादर –सातारा एक्सप्रेस दररोज सोडावी त्यामुळे प्रवाशांची मुंबईला जाण्याकरता दररोज सोय होणार आहे,
व सांगोला स्टेशन परिसरात बेसुमार बाभळी, अनावश्यक झाडी वाढलेले आहेत त्यामुळे अस्वच्छता, रोगराई व चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत या सर्व समस्यांची मागणी सविस्तरपणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांच्याकडे सांगोला दौऱ्यामध्ये केली
असल्याची माहिती अशोक कामटे संघटनेच्यावतीने केली आहे यावेळी डी आर एम मिश्रा साहेबांनी सर्व समस्या व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कामटे संघटनेस यावेळी दिले यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.




0 Comments