सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्य यांचा स्वागत समारंभ संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने व नवनिर्वाचित सदस्य यांचा स्वागत समारंभ मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सर्व सदस्यांचा शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विभागप्रमुख यांनी आपल्या विभागाची माहिती दिली.
सांगोला शहराला विकासाची नवी उंची गाठण्यासाठी प्रशासन व सदस्यांनी एकत्र काम करावे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांची कामे जलद गतीने निकाली काढावीत अशा सूचना लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.आनंदा माने यांनी केल्या.
नगरसेविका सौ. राणी माने, नगरसेवक श्री. रमेश जाधव व नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर तेली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी
कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.


0 Comments