धक्कादायक! सासरच्या भांडणाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; विहिरीत उडी मारली अन्...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पंढरपूर मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आयुष्याचा शेवट केला आहे. सासरच्यांशी झालेल्या किरकोळ वादातून महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
या घटनेनंतर पीडितेची दोन मुले आईच्या मायेला पोरखी झाली आहेत. मृत महिलेचे नाव प्राजक्ता साखरे असून पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पंढरपूर मधील करमाळा तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे. या गावात राहणाऱ्या साखरे कुटुंबीयांमध्ये कडाक्याचा वाद झाला.
सासरच्यांशी झालेल्या किरकोळ वादातून प्राजक्ता संतापली. रागारागात तिने घराजवळील विहिरीत उडी मारली. प्राजक्ताला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.
प्राजक्ताच्या मागे तिच्या कुटुंबात तिची दोन मुलं, नवरा, सासू सासरे आहेत. प्रजक्ताच्या आत्महत्येने आईच्या मायेला दोन मुले पोरखी झाली आहेत.
प्रजक्ताच्या आत्महत्येनंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी करमाळा पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कलमानुसार दशरथ नामदेव साखरे, नंदा नामदेव साखरे, नामदेव साखरे, निता संतोष वाळुंजकर,
संतोष वाळुंजकर यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून प्रजक्ताच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


0 Comments