आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांचा पोलिस पाटील संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नागपूर येथे राज्यातील पोलीस पाटील यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन चालू असून या आंदोलनस्थळी
आज सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख भेट देवून या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, पोलीस पाटील अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती होवून
या अधिनियमाचे काटेकोरपणे अमंलबजावणी व्हावी. तसेच पोलीस पाटील यांचे नुतणीकरण कायमस्वरुपी बंद करावे.
याचबरोबर पोलीस पाटील यांची वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६५ वर्षे करावी तसेच सन २०१९ पासून राज्यातील पोलीस पाटील यांच्या वारसांना अनुकंपा कायदा लागू करण्यात यावा.
पोलीस पाटील यांना सेवानिवृत्ती नंतर एकरकमी २० लाख रुपये मिळावेत तसेच पोलीस पाटील यांच्या करिता कल्याण निधी स्थापन करावा.
अंशकालिन गृह विभाग व महसूल विभागामध्ये पद भरतीमध्ये ज्यांची किमान १० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांना समांतर आरक्षण मिळावे.तसेच अतिरिक्त पदभार असलेल्या गावामध्ये २५%
अतिरिक्त मानधन मिळावे.पोलीस पाटील यांचे मानधन व प्रवास भत्ता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत मिळावा.
आणि पोलीस पाटील यांना विमा कवच लागू करावे. राज्यशासनाने तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या त्वरित मान्य करून पोलिस पाटील संघटनेला न्याय द्यावा.


0 Comments