google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर महानगर पालिका निवडणूक प्रभारी पदी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड

Breaking News

सोलापूर महानगर पालिका निवडणूक प्रभारी पदी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड

सोलापूर महानगर पालिका निवडणूक प्रभारी पदी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड


सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 

जबाबदारी सोपविण्यात आली असून मिशन सोलापूर महापालिका सुरू झाले आहे. 

सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्या संदर्भात चर्चा सुरू झाल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील  यांनी सांगितले आहे. 

सोलापूर महापालिकेसाठी जर अजित पवार गटाकडून प्रस्ताव आल्यास त्यांनाही आघाडीत सामील करून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, याबाबत वरिष्ठांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अजितदादा पवारांच्या  सोबत जाण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 अजित पवारांचा पक्षाकडूनही आघाडीचा प्रस्ताव भाजपला रोखण्यासाठी आघाडी

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 

आता सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिलीं आहे. यानंतर पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

सोलापूर शहरात देखील मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मोहिते पाटील पॅटर्न 

सोलापूर महापालिकेत राबवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन आहे. 

त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाशी चर्चा सुरू केली आहे. यात जर अजित पवारांचा पक्षाकडूनही

 आघाडीचा प्रस्ताव आल्यास भाजपला रोखण्यासाठी त्यांचे सोबत आघाडी केली जाईल असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments