निजामबाद– पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करावा:– अशोक कामटे संघटना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ( प्रतिनिधी) धनबाद– कोल्हापूर रेल्वेची एक फेरी वाढवावी, निजामबाद– पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरज जंक्शन पर्यंत करण्यात यावा अशी मागणी
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दीक्षाभूमी एक्सप्रेस
रेल्वे क्रमांक 11045 व 11046 कोल्हापूर– धनबाद– कोल्हापूर या रेल्वेस प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस धावत असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होत
असून तरी आठवड्यातून दुसरी फेरी मंगळवारी देखील सुरू करावी म्हणजे प्रवाशांची नागपूर , जबलपूर,प्रयागराज, गया या ठिकाणी जाण्याकरिता सोय होईल,
तसेच ट्रेन क्रमांक 11413 व 11414 निजामबाद– पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरज स्टेशन पर्यंत करावा त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला
या भागातील प्रवाशांची नांदेड, पूर्णा,आदिलाबाद, किनवट माहूरगड (शक्तीपीठ) या ठिकाणी जाण्याची दररोज सोय होईल
तरी या मागणीचा रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करून या सेवा मंजूर करणे विषयी आग्रही मागणी शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे.
या निवेदनाचा पाठपुरावा करण्याकरिता कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, सोलापूर येथील सर्व
खासदार महोदय, मा. जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे मुंबई, सिकंदराबाद,
मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर,पुणे यांनाही अशोक कामटे संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहेत . यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:–
निजामबाद –पंढरपूर या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करावा, शक्य नसेल तर किमान तो सांगोल्यापर्यंत करावा म्हणजे
मंगळवेढा, आटपाडी व सांगोला परिसरातील नागरिकांना दररोज या रेल्वेने प्रवास करून कुर्डूवाडी येथून वंदे भारत
एक्सप्रेसने काही तासातच मुंबई गाठणे शक्य होणार आहे, तसेच कोल्हापूर –धनबाद– कोल्हापूर (दीक्षाभूमी एक्सप्रेस )
रेल्वेची दर मंगळवारी एक फेरी वाढवून उत्तर भारतात जाणारे प्रवाशांची सोय होणार आहे याकरिता कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.
श्री निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना सांगोला.




0 Comments