google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील 804 शिक्षक सामूहिक रजेवर

Breaking News

सांगोला तालुक्यातील 804 शिक्षक सामूहिक रजेवर

सांगोला तालुक्यातील 804 शिक्षक सामूहिक रजेवर


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : टीईटी विरोधात आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून सोडवणूक होत

 नसल्यामुळे विविध मागण्यांसाठी राज्यातील संघटना व शिक्षकांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात जिल्हा परिषद व खासगी

 अनुदानित व विनाअनुदानित शाळांवरील सुमारे 804 शिक्षक सामूहिक रजेवर गेल्याने तालुक्यातील 330 शाळा बंद राहिल्या.

उर्वरित हजर शिक्षकांवर 61 सुरू ठेवण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी दिली आहे.

नवीन संच मान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे, दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती, तसेच ऑनलाईन अशैक्षणिक कामांचे वाढते 

ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सांगोला तालुक्यातील शिक्षक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार, दि. 5 रोजी राज्यव्यापी संप पुकारला. 

यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 324 तर खासगी अनुदानित आणि विनाअनुदानितच्या 6 असे एकूण 330 शाळा बंद ठेवत, शिक्षकांनी आक्रोश मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments