google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अनगर नगरपंचायत बिनविरोध, आज घोषणा! सोलापूर जिल्ह्यातील 'या' 5 नगरपरिषदांच्या 26 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला निकाल

Breaking News

अनगर नगरपंचायत बिनविरोध, आज घोषणा! सोलापूर जिल्ह्यातील 'या' 5 नगरपरिषदांच्या 26 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला निकाल

अनगर नगरपंचायत बिनविरोध, आज घोषणा! सोलापूर जिल्ह्यातील 'या' 5 नगरपरिषदांच्या 26 जागांसाठी


20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला निकाल

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर : मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याठिकाणी नगराध्यक्षांसह २१ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. याशिवाय पंढरपूर (प्रभाग क्र. सात ब), मैंदर्गी (प्रभाग क्र.सहा अ) नगरपरिषदेतील प्रत्येकी एक आणि मोहोळ (प्रभाग क्र. तीन अ व पाच ब) व 

सांगोल्यातील (प्रभाग एक अ व ११ अ) प्रत्येकी दोन जागांसाठीही त्याच दिवशी मतदान होणार आहे. अर्ज माघारीनंतर येथील उमेदवारांना १२ ते १९ डिसेंबरपर्यंत आठ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत.

ज्या नगरपरिषदांमधील हरकतींचा वाद तथा अपील न्यायालयात दाखल झाले. ज्यावर न्यायालयातून २२ नोव्हेंबरनंतर निकाल मिळाला, त्या नगरपरिषदा, काही नगरपरिषदांमधील सदस्यांची निवडणूक लांबणीवर पडली होती. 

त्यासाठी २० डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तेथील उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी उद्यापर्यंत (बुधवार) मुदत देण्यात आली आहे.

अर्ज माघारीनंतर ११ डिसेंबरला चिन्हवाटप होईल. ज्याठिकाणी एकमेव उमेदवार आहे, तेथील सदस्य बिनविरोध होतील. राहिलेल्या उमेदवारांना १२ ते १९ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार आहे. 

दरम्यान, २० डिसेंबरला मतदान झाल्यावर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील पूर्वीच्या १० नगरपरिषदांसह राहिलेल्या या सदस्यांच्या जागांचाही निकाल जाहीर होणार असून सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होणार आहे.

बिनविरोध 'अनगर'ची अधिकृत घोषणा आज

अनगर नगरपंचायतीसाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्याठिकाणी प्रत्येक प्रभागात एकाच उमेदवाराचा अर्ज असून नगराध्यक्ष म्हणून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचाही एकमेव अर्ज आहे. 

ते सगळेजण बिनविरोध झाले आहेत, तरीपण निवडणूक आयोगाच्या नव्या वेळापत्रकानुसार ज्या उमेदवारास अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यासाठी उद्या (बुधवार) शेवटची मुदत आहे. 

१७ पैकी कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक निर्णय अधिकारी या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाला कळवतील. बुधवारी (ता. १०) दुपारी तीन वाजेपर्यंत अनगर नगरपरिषद बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे. 

पाटील यांच्या विरोधातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला, पण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोधाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली होती.

Post a Comment

0 Comments