google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुणे पोलीस आयुक्तालयात 'बोगस' IPS अधिकारी! नाव घेताच 'तो' खरा अधिकारी समोर, तोतया अधिकाऱ्याचा 'कसा' झाला पर्दाफाश

Breaking News

पुणे पोलीस आयुक्तालयात 'बोगस' IPS अधिकारी! नाव घेताच 'तो' खरा अधिकारी समोर, तोतया अधिकाऱ्याचा 'कसा' झाला पर्दाफाश

पुणे पोलीस आयुक्तालयात 'बोगस' IPS अधिकारी! नाव घेताच 'तो'


खरा अधिकारी समोर, तोतया अधिकाऱ्याचा 'कसा' झाला पर्दाफाश

पुणे: शहरात एका व्यक्तीने स्वतःला IPS अधिकारी भासवून थेट पुणे पोलीस आयुक्तालयात  प्रवेश केला. एका वरिष्ठ पोलीस 

अधिकाऱ्यासमोर त्याने आपल्या 'बॅचमेट'चे नाव घेतले, परंतु त्याच वेळी तो खरा IPS अधिकारी तेथे उपस्थित असल्याने या बोगस अधिकाऱ्याचे पितळ उघडं पडलं.

याप्रकरणी एकावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर वाघमोडे असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचा मूळ रहिवासी असलेल्या सागर वाघमोडे याने आपण IPS अधिकारी असल्याची बतावणी

 करत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्तालयात गेला. तो एका वरिष्ठ पोलीस उपायुक्तांना भेटण्यासाठी गेला होता. 

यावेळी गप्पा मारताना त्याने आपला मित्रही IPS अधिकारी असून, तो त्याचा ‘बॅचमेट’ असल्याचे सांगितले. वाघमोडेने ज्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव घेतले, 

योगायोगाने ते खरे IPS अधिकारी त्याच वेळी समोर आले. यामुळे वरिष्ठ उपायुक्तांना वाघमोडेवर संशय आला आणि त्यांनी अधिक चौकशी केली.

बोगस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिसांना बोलावून घेत सागर वाघमोडेला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस आयुक्तालयात प्रवेश करताना सामान्य नागरिकांची गेटवर चौकशी केली जाते आणि कामाची विचारणा होते. अशा सुरक्षित ठिकाणी एका व्यक्तीने थेट 

वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून आपण IPS अधिकारी असल्याचे खोटे सांगण्याचे धाडस केल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सागर वाघमोडेची कसून चौकशी सुरू आहे. तो पोलीस आयुक्तालयात का आला? त्याला कोणाला भेटायचे होते?

 आणि या बनावटगिरीमागे त्याचा नेमका उद्देश काय होता? याचा कसून तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments